Tuesday , December 9 2025
Breaking News

बेळगाव जेलमधून हलवण्यात यावं म्हणून नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली, आरोपी जयेश पुजारीचा दावा

Spread the love

 

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन करणारा कुख्यात गँगस्टर जयेश पुजारीनं बेळगाव आणि नागपूर पोलिसांच्या चौकशीत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातून असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलिस इथून बाहेर काढतील आणि संधी मिळताच पळून जायचं अशी त्याची योजना होती. पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झालीय. त्यामुळं त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती. मात्र सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

जयेश पुजारीने नेमके काय खुलासे केले?
1) धमकीचे फोन करण्यामागे प्रकाश झोतात येण्याची योजना होती असे जयेश पुजारीने चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

2) जयेश पुजारीला काहीही करुन बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघायचे होते. त्यासाठीच तुरुंगातूनच असे काही कृत्य करायचे की दुसऱ्या ठिकाणी गुन्हा नोंद होऊन तिथे नेण्यासाठी पोलीस इथून बाहेर काढतील अशी त्याची योजना होती.

3) असे झाल्यावर संधी मिळताच पळून जाण्याची जयेश पुजारीची योजना होती.

पोलिस जयशे पुजारीची सखोल चौकशी करणार
दरम्यान, हत्येच्या दोन प्रकरणांमुळं जयेश पुजारीला झालेली फाशीची शिक्षा कमी होऊन त्याला जन्मठेप मिळाली आहे. जन्मठेप मिळाल्यामुळं जयेश पुजारीला आयुष्यभर तुरुंगातच राहावं लागेल. यामुळेच तो तुरुंगातून पळून जाण्याच्या योजनेवर काम करत होता. त्याच्यातूनच त्याने बेळगावच्या तुरुंगातून बाहेर निघण्यासाठी आणि पळून जाण्याची संधी मिळवण्यासाठी असे कृत्य केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, सध्या तरी पोलीस त्याच्या या स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत . त्यामुळं पुढेही पोलिस जयेश पुजारीची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कालच नागपूर पोलिसांनी घेतला होता आरोपी पुजारीचा ताबा
दरम्यान, कालच ( 28 मार्च) मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याचा ताबा नागपूर पोलिसांना मिळाला आहे. जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. ही टीम आता आरोपी जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. या चौकशीत आरोपी जयेश पुजारीने काही खुलासे केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *