मुंबई – काल मंगळवारपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापालक झालेली पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदापासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला, आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीनंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यातच शरद पवार यांच्या घोषणेनंतर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र ही सुरू केले आहे. याचवेळी राज्यभरातील पक्षाचे पदाधिकारी शरद पवार यांना भेटून जात आहेत.
त्यानंतर शरद पवार यांनी पाच मेला राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडण्याबाबत सूचना केल्याचे कळते. तरुण-तरुणींना प्रवाह आणायचे आहे. त्याचबरोबर पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय जाहीर करणे आवश्यक होते. मात्र असे काही केले असते तर त्याला विरोध झाला असता. त्यामुळेच अचानकपणे आपण निर्णय जाहीर केला. पक्ष समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल,असेही त्यांनी सांगितले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta