
माणगांव (नरेश पाटील) : आदर्श महिला मंडळ माणगांव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा केला.
आदर्श महिला मंडळामार्फत दि. ७ मार्च रोजी मंडळाच्या सभागृहात कार्यक्रम घेतला. सुरूवातीस स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, सिंधूताई सपकाळ, माणगांवमधील व्हिक्टोरिया क्रॉस वीर घाडगे यांची पत्नी लक्ष्मीबाई,बकोरोनामुळे मृत्यू पावलेले ज्ञात-अज्ञात व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. लताजींच्या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. माणगाव नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका शर्मिला सुर्वे (सभापती महिला बालकल्याण), रिया उभारे, नंदिनी बामुगडे, ममता थोरे, सुशिला वाढवळ, सुविधा खैर, रश्मी मुंडे, लक्ष्मी जाधव नगसेविकांचे श्रीफळ व इकोफ्रेंडली भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सन २०२० ते २०२२मध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखविलेल्या महिला अनुष्काभावे (को.म.सा.प.उपाध्यक्ष), तनुजा मेथा (कोमसापसदस्य), निलम मेथा (माजी नगरसेविका), श्रद्धा अंबुर्ले (जि. उपक्रम कोमसाप सहसचिव), जुई शेट (डॉक्टर ), धनदा मेथा (डॉक्टर ), गीता मेथा(गृहोद्योग), हर्षाली बापट(इंजि), मुग्धा शेट (इंजि), सेजल मेथा(इंजि), प्रणिता मेथा (शिक्षिका) यांचा सत्कार करण्यात आला.
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निलम मेथा, ज्योती बुटाला, श्रद्धा अंबुर्ले, अनुष्का भावे, मेघना येलवे या महिलांनी कविता, गीते सादर केली.
प्राजक्ता लोखंडे यांनी नटसम्राटमधील एकांकिका सादर केली. कार्यक्रमात विरंगुळा म्हणून प्रश्नमंजूषा शेठ परिवाराकडून घेण्यात आली. त्यांच्याकडूनच बक्षीसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता विश्वशांती प्रार्थना पसायदान सामुदायिक बोलून करण्यात आली.
कार्यक्रम उत्साहाने पार पाडण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा सुमन दोशी, उपाध्यक्षा सुलभा निकम, सेक्रेटरी शोभा धारीया, खजिनदार श्वेता देसाई, कार्यकारणी सदस्य मनिषा ढवण, श्रद्धा अंबुर्ले, अनुष्का भावे, मंगल बापट, स्नेहल दोशी, सुलभा मेथा, प्रमिला दंत, संजीवनी मेथा, उषा शेट तसेच सदस्य न.प. सदस्य योगिता शेट, अश्विनी शेठ, सुजाता शेठ, नेहा केकाणे, मिनल मेथा, योगीता शेट, मेघना येलवे, श्वेता शेठ, कल्पना मेथा, पल्लवी शेट, कांचन मेथा, मंदा मेथा यांनी खूप मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्वेता शेट यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta