मुंबई : अखेर रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं विलंब झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. पुढील आठवडयात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
भरत गोगवले, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, बच्चू कडू, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील शिवसेनेच्या या आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta