Wednesday , December 10 2025
Breaking News

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा शरद पवारांना प्रस्ताव, प्रफुल्ल पटेल यांच्या प्रतिक्रियेनंतर मोठ्या उलथापालथी?

Spread the love

 

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांना दिला,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसंच शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचा विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतंही भाष्य केलं नाही, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांसह शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भेटीविषयी माहिती दिली. सुमारे तासभर चर्चा या भेटीत झाले.

शरद पवार आमचे दैवत, राष्ट्रवादी एकसंध राहिल यावर विचार करुन मार्गदर्शन करण्याची विनंती : पटेल
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “आम्हा सर्वांचे दैवत आदरणीय शरद पवार यांची आज भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतली. शरद पवार हे बैठकीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये असल्याचं समजलं. त्यामुळे वेळ न मागता आम्ही इथे आलो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध कसा राहिल याचाही विचार करुन त्यांनी येत्या काही दिवसात मार्गदर्शन करावा अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं.”

देवगिरी बंगल्यावरील बैठकीनंतर अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला
देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वाय बी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखीलही तातडीने वाय. बी. चव्हाण सेंटरवर दाखल झाले. मला सुप्रिया सुळेंचा फोन आला म्हणून मी लवकर निघालोय. शरद पवारांनी बोलवलंय, लवकर या असं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *