Wednesday , March 4 2026
Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळ एसटी बसला भीषण अपघात; एक ठार १९ जखमी

Spread the love

 

रायगड : जवळ आलेल्या गणेशोत्सवामुळे गेले काही दिवस वर्दळीच्या ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाला आहे. माणगाव जवळ रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता एसटी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर १९ जण जखमी झाले असून सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.

एसटी बस मुंबई राजापूरकडे (एमएच 14 बीटी 266) जाणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी काही वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *