मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील विधानसभा अध्यक्षांवी वैध ठरवली आहे.
शिवसेनेच्या हे 16 आमदार पात्र
एकनाथ शिंदे (ठाणे)
तानाजी सावंत (भूम परंडा)
प्रकाश सुर्वे (मागाठाणे, मुंबई)
बालाजी किणीकर (अंबरनाथ, ठाणे)
लता सोनावणे (चोपडा, जळगाव)
अनिल बाबर (खानापूर)
यामिनी जाधव (भायखळा, मुंबई)
संजय शिरसाट (छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
भरत गोगावले (महाड, रायगड)
संदीपान भुमरे (पैठण)
अब्दुल सत्तार (सिल्लोड)
महेश शिंदे (कोरेगाव)
चिमणराव पाटील (एरंडोल, जळगाव)
संजय रायमूलकर (मेहेकर)
बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
रमेश बोरणारे (वैजापूर)