
माणगांव (नरेश पाटील) : पुणे दिघी राज्य महामार्ग मोर्बा रोड येथील दुतर्फा गटाराचे काँक्रिटचे काम मागील तीन वर्षांपासून रखडले होते. याची दखल घेत माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी या कामाची दखल घेत तातडीची बैठक बोलावली आणि संबंधित कंत्रातदाराशी चर्चा करून कामात ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला चालना दिली. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदर काम इतके दिवस का रखडले होते असा सवाल कंत्राटदारास विचारला असता ते म्हणाले की, रस्त्याच्या कामात अनेक अडचणी होत्या. जसे की अंडर ग्राऊंड केबल, एमएसईबीच्या विद्युत खांब, टेलिफोन खात्याची कामे चालू होती. त्याचबरोबर स्थानिक लोकांकडून कामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे रस्त्याच्या कमला विलंब झाला असे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. नवनिर्वाचित नागराध्यक्षांच्या प्रयत्नांमुळे कमला चालना मिळाली त्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta