Friday , November 22 2024
Breaking News

सुप्रिया सुळे, कोल्हे पहिल्या यादीत; नगरमधून निलेश लंके; शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर

Spread the love

 

बारामती : शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आलं आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातून नितेश कराळे गुरुजी इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची तीन वेळा भेटही घेतली होती. पण त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत एका महिलेला स्थान देण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी दिली गेली आहे. शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे तर नगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही पहिली यादी असून अजून एक यादी जाहीर होणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत पवार गटाच्या वाट्याला किती जागा येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

साताऱ्याचा सस्पेन्स कायम
दरम्यान, पवार गटाच्या यादीत साताऱ्याची जागा घोषित करण्यात आलेली नाही. साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी शरद पवार कुणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काल शरद पवार सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे कालच या उमेदवारांची घोषणा होईल असं सांगितलं जात होतं. पण साताऱ्याची जागा अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही. साताऱ्यातून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शरद पवार ही जागा काँग्रेसला सोडणार का? सोडली तर त्या बदल्यात राष्ट्रवादीकडे कोणती जागा येणार? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.

पक्षप्रवेशानंतरही नाराजी
नितेश कराळे गुरुजी हे वर्ध्याच्या जागेसाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी शरद पवार यांची तीनदा भेटही घेतली होती. वर्ध्याची जागा का दिली पाहिजे याची माहितीही त्यांनी शरद पवार यांना दिली होती. ही जागा मिळावी म्हणून काल कराळे गुरुजींनी शरद पवार गटात प्रवेशही केला होता. त्यामुळे कराळे गुरूजींना वर्ध्याची जागा मिळेल अशी चर्चा होती. पण शरद पवार गटाने कराळे गुरूजींऐवजी अमर काळे यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे कराळे गुरुजींच्या पदरी निराशा आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *