बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशन येथे रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. काळजी केंद्रात राहणाऱ्या आबालवृद्धांनी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत होळीचा आनंद लुटला. काळजी केंद्रात राहणाऱ्या आजीआजोबांना होळीचा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी देखील आजीआजोबांसोबत रंगपंचमीचा आनंद लुटला त्याचबरोबर आजी आजोबांना आणि इतर कर्मचाऱ्यांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. संजीवीनी फौंडेशन या काळजीकेंद्रात सगळे सण आनंदाने साजरे केले जातात जेणेकरून येथे राहणाऱ्या आजीआजोबांना घरगुती वातावरण मिळते यासाठी संजीवीनी फौंडेशनचे सीईओ मदन बामणे नेहमीच प्रयत्नशील असतात.