Friday , November 22 2024
Breaking News

वसंत मोरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; शिवसेनेत प्रवेश करणार!

Spread the love

 

मुंबई : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही केली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत हेही यावेळी मातोश्रीवर होते.

वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चाही झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असेही समजते. पुढील आठवड्यात 9 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. वसंत मोरे यांनी मनसेत वरिष्ठांकडून होत असलेल्या दुर्लक्षितपणामुळे मनसेला जय महाराष्ट्र केला होता. यावेळी, राज ठाकरेंबद्दल आपली नाराजी नसून काही वरिष्ठांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, लोकसभा निवडणुकांपूर्वीच त्यांनी मनसे सोडल्याने ते शिवसेनेत किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे, ते राष्ट्रवादीतही जाऊ शकतात, असेही बोलले जात. मात्र, ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरेंची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे, त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करुन आपली पुढील राजकीय वाटचाल नव्याने सुरू केली होती. मात्र, निकालानंतर महिनाभरातच त्यांनी वंचितला सोडून शिवसेनेची कास धरल्याचं दिसून आले.

विधानसभा लढवणार
आता पक्ष प्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल. मी वंचितमध्ये गेलो होतो. मात्र, मतदारांनी मला स्वीकारलं नाही. या अगोदर मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडव आव्हान देऊ असेही मोरेंनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरेंनी स्वगृही आल्याबद्दल स्वागत केले. मी उशीर केला असं ते म्हणाले. मला दोन पर्याय आहेत, खडकवासला आणि हडपसर, दोन्हीकडून मी विधानसभा लढू शकतो. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं, माझा तो भाग नव्हता, तरीही मला चांगली मते मिळाली. माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला. मी बदलणार नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करत राहू. शिवसेना शहरात आणि बाहेरच्या भागात त्यांची ताकद आहे, 10 नगरसेवक आहेत, असेही मोरेंनी म्हटले.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *