मुंबई : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेमके कोणत्या ठिकाणी होणार, याची अनेकांना उत्सुकता लागून होती. याबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून 98 वे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 70 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे.
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जवळपास 8 ठिकाणाहून निमंत्रण प्राप्ती झाली होती. यानंतर साहित्य संमेलनाच्या निवड या ठिकाणांना भेट दिली.
फेब्रुवारीमध्ये झालेले यंदाचे संमेलन अमळनेर येथे झाल्याने धुळ्याचा पर्याय बाद करण्यात आला. तसेच औंध आणि औंदुबर ही दोन्ही ठिकाणे लहान असल्याचे कारण देत त्यांना नासपंती देण्यात आली. अशा प्रकारे धुळे, औंध आणि औंदुबर या तीनही संमेलनस्थळांना बाद करण्यात आले. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी राजधानी दिल्ली, मुंबई आणि इंचलकरंजी हे 3 ठिकाण बाकी होते. आज यावर मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत निवड समितीने आगामी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीतच घेण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी 1954 साली लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते.