Wednesday , December 4 2024
Breaking News

शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Spread the love

 

मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज (२६ ऑक्टोबर) शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज १५ उमेदवारांची घोषणा करण्यात आली यामध्ये धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघाचा सहभाग आहे.

मतदारसंघाचे नाव उमेदवार

१. शिवडी : अजय चौधरी
२. धुळे शहर : अनिल गोटे
३. चोपडा : राजू तडवी
४. जळगाव शहर : जयश्री सुनील महाजन
५. बुलढाणा : जयश्री शेळके
६. दिग्रस : पवन श्यामलाल जयस्वाल
७. हिंगोली : रुपाली राजेश पाटील
८. परतूर : आसाराम बोराडे
९. देवळाली : योगेश घोलप
१०. कल्याण पश्चिम : सचिन बासरे
११. कल्याण पूर्व : धनंजय बोडारे
१२. वडाळा : श्रद्धा श्रीधर जाधव
१३. भायखळा : मनोज जामसुतकर
१४. श्रीगोंदा : अनुराधा राजेंद्र नागावडे
१५. कणकवली : संदेश भास्कर पारकर

About Belgaum Varta

Check Also

शिवशाही बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी ठार

Spread the love  गोंदिया : शिवशाही बस उलटून १५ प्रवासी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *