Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटकचे पुन्हा ‘नाटक’, अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय

Spread the love

 

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती मिळाली आहे. ही परवानगी मिळाल्यास सांगली आणि कोल्हापूरला पावसाळी पुराचा धोका आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार याबाबत काय निर्णय देतं याकडे महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

2005, त्यानंतर 2019 आणि पुन्हा 2021 ला कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार उडाला. अनेकांचे प्राण गेले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले, हजारो एकर शेतीच नुकसान झाले. या प्रत्येक महापुरावेळी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी हे धरण कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्राकडून करण्यात आला. कर्नाटककडून अलमट्टी धरणातून पाणी न सोडण्यात आल्याने कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा वाढत जाऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याचा दावा महाराष्ट्राकडून करण्यात आला. मात्र आता कर्नाटक सरकारने ते या धरणाच्या भिंतीची उंची 519 मीटरवरून आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करणार असल्याचे जाहीर केल आहे. सध्या बेळगावमध्ये सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यासाठी बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत सत्ताधारी काँग्रेसने केलेल्या धरणाची उंची वाढवण्याच्या मागणीला विरोधी पक्ष असलेल्या भाजपने देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावादाबरोबरच कृष्णेच्या पाण्याचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही; प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीचे वादग्रस्त वक्तव्य

Spread the love  मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ममता अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा …

One comment

  1. आरे काय मनमानी आहे कि काय आसकस उंचीवाढवतात, न्याय चा ,मानुसकिचा काय महत्व आहे कि नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *