Thursday , December 11 2025
Breaking News

तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन

Spread the love

 

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन

सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी, पायी वारी करतात. मजल, दरमजल करत पंढरपूरला येतात. तासन तास रांगेत उभे राहून बा विठ्ठालाचे तेजोमय रुप आपल्या डोळ्यांत साठवतात. आता, विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वच भाविकांना लवकरच झटपट दर्शन मिळणार आहे. त्यासाठी तिरुपतीच्या धरतीवर केलेली टोकन दर्शन व्यवस्थेची सुरुवात आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. मंदिर समितीची यासंदर्भातली बैठक झाल्यानंतर औसेकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानुसार टीसीएस कंपनीकडून या व्यवस्थेचे सॉफ्टवेअर बनविण्यात आले आहे. आज या सॉफ्टवेअरबाबत मंदिर समिती सदस्य अधिकारी आणि टीसीएसच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत आषाढी एकादशी पूर्वी संपूर्ण टोकन दर्शन व्यवस्था पूर्ण होणार असून आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्याच्या हस्ते याचा शुभारंभ केला जाईल, असे ठरले.

देशातील जवळपास नऊ मोठ्या देवस्थानात टीसीएस कंपनीकडून या दर्शन व्यवस्थेचे सॉफ्टवेअर देण्यात आले असून या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून अतिशय सुरळीतपणे टोकन दर्शन व्यवस्था राबविण्यात येत आहे. हे टोकन दर्शन व्यवस्था सॉफ्टवेअर बनविताना पंढरपुरातील मोठ्या यात्रा सणांचे दिवस आणि इतर महत्त्वाच्या गर्दीच्या दिवसांचा विचार या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठीचे टोकन घ्यावे लागणार असून यावेळेस त्यांना दर्शनाची तारीख आणि वेळ हे टोकन वरुन दिले जाणार आहे. याचवेळेत येऊन या भाविकांना देवाचे दर्शन केवळ दीड ते दोन तासात घेता येणार आहे.

15 दिवसांत जिल्हा प्रशासनाची बैठक
सध्या तरी टोकन दर्शन व्यवस्था सुरू केली तरी काही दिवस भाविकांना माहिती होण्यासाठी मुख्य दर्शन रांग देखील सुरू ठेवली जाणार आहे. याशिवाय देशभरातील भाविकांना ऑनलाइन बुकिंग करूनही देण्यात येणाऱ्या दर्शनाची रांग सुरूच राहणार आहे. आता टोकन दर्शन रांग ऑनलाईन दर्शन रांग आणि मुख्य दर्शन रांग या तिन्हीचे एकत्रीकरण कशा रीतीने करायचे याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलिस अधीक्षक यांच्यासोबत टीसीएस च्या अधिकाऱ्यांची एक बैठक येत्या 15 दिवसांत होऊन त्यानुसार अंतिम आराखडा तयार होईल, अशी माहिती औसेकर यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

‘हास्यसम्राट’ मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन

Spread the love  मुंबई : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *