मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाबाबतचा जुना व्हिडीओ राज ठाकरे यांनी ट्विट केला होता. बाळासाहेबांच्या भाषणाचे कॅसेट्स पाठवू त्या पहा. सर्व भोंगे बंद करा असे बाळासाहेब कधीच म्हणाले नाहीत, असे राऊत यांनी सांगितले.
राजकीय स्वार्थाकरिता महाराष्ट्रात चिथावणीची भाषा
भोंग्याबाबत आंदोलन करावे अशी परिस्थिती आता नाही. राजकीय स्वार्थाकरिता महाराष्ट्रात चिथावणीची भाषा केली जात आहे. मशिंदींवरील भोंग्याबाबत कायद्याने काही नियम घालून दिले आहेत. भोंगे बंद करायचे असतील तर भजन, किर्तनाचे भोंगेदेखील बंद करायचे का? असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. भोंग्याबाबत कायद्याचे उल्लंघन नाही. फक्त प्रसिद्धीसाठी आंदोलन करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. आंदोलने कशी करावी हे शिवसेनेकडून शिकावे, असेही ते म्हणाले.
ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यांनी त्याचं राजकारण करावे. पण दुसर्याने काय करावे यावर तुम्ही बोलू नका. मनसेला हिंदुत्व देणार्यांची डिग्री बोगस आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधानांनी या सर्व परिस्थितीवर गांभिर्याने दखल घ्यावी.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …