मुंबई : येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील आपल्या लाखो मराठा बांधवांसह मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहेत. दरम्यान, जरांगे यांच्या या आंदोलनाची पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली आहे. एकीकडे गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईत येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्या व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जरांगे हे मुंबईत येण्यावर ठाम असून त्यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पाडणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.
सर्वांनी मुंबईत यावे, माझे आवाहन
मनोज जरांगे हे जालन्यात बोलत होते. यावेळी त्यांनी 29 ऑगस्टच्या मोर्चाबाबत भाष्य केलं. या मोर्चासाठी मराठा बांधवांनी मोठ्या ताकदीने आले पाहिजे. 29 ऑगस्टला सर्वांनी मुंबईला या असे माझे आवाहन आहे. समाजाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
फडणवीस यांचे मराठ्यांना बरबाद करण्याचे स्वप्न
तसेच, राजकारण्यांच्या दबावात कोणीही राहू नये. मुंबईत कोणताही राजकारणी येणार नाही. सरकारमधून आम्हाला प्रतिसाद दिला जात नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांचे मराठ्यांना बरबाद करण्याचे स्वप्न आहे. मराठ्यांची पोरं आत्महत्या करून मेली पाहिजेत, हे त्यांचं काम आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta