Monday , December 8 2025
Breaking News

संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना

Spread the love

पुणे : मी आतापर्यंत समाजाच्या हितासाठी लढलो आहे. पण, गेल्या काही वर्षांपासून मला खासदारकी मिळाली. त्यामध्ये अनेक कामं करता आली. समाजासाठी कामे करायची असेल तर सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे मी येत्या काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, असं छत्रपती संभाजी राजे यांनी जाहीर केलं.
नव्या संघटनेची घोषणा
मी आजपर्यंत समाजासाठी केलेली कामे पाहून माझ्या मागे आपण उभे राहायला पाहिजे. मला राज्य सभेत पाठवायला पाहिजे, असं आवाहन देखील संभाजी राजेंनी अपक्ष आमदारांना केलं आहे. मी आजपासून कुठल्या ही पक्षात नाही. सगळ्यांना संघटित करण्यासाठी जिथे अन्याय होतो तिथे लढा देण्यासाठी मी आहे. आम्ही सर्व एक संघटना स्थापित करणार आहोत. त्याचं नाव स्वराज्य आहे, असंही संभाजी राजेंनी सांगितलं. ही संघटना राजकीय पक्ष झाला तरी त्याला हरकत नसावी. हा पहिला टप्पा आहे, असं म्हणत त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्याचे संकेत दिले.
पंतप्रधानांचे मानले आभार
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यानंतर बोलून विनंती केली की, राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. म्हणून मी ते पद स्विकारलं. मी राष्ट्रपती महादोय, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यावेळी मी त्यांना शाहू महाराजांचं पुस्तक दिलं होतं. मी छत्रपती शिवाजी आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालणार आहे, असं त्या पुस्तकावर मी लिहिलं होतं. त्याप्रमाणे आतापर्यंत चाललो. या सहा वर्षात अनेक कामं केली. व्यापक दृष्टीकोणातून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिल्लीत सुरू केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती कोणी साजरी केली असेल तर मी सुरू केली. शिवाराज्यभिषेक सोहळा अधिक व्यापक केला. संसदेत शाहू महाराज आणि छत्रपतींच्या विचारावर बोललो. माझ्यामुळे राष्ट्रपती रायगडावर आले, असं छत्रपती संभाजी महाराज म्हणाले. माझ्या कामामुळे माझ्यावर विश्वास ठेवावा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत मला साथ द्यावी, असं आवाहन देखील छत्रपती संभाजी राजेंनी केलं.

About Belgaum Varta

Check Also

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, निलंबनाचे आदेश…

Spread the love  कोल्हापूर : काल ठाकरे शिवसेने नेते कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील अव्यवस्थेवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *