मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी कर्नाटक राज्यात झिरो एफआयआर दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. झिरो एफआयआर म्हणजे काय? हे सांगताना कर्नाटक सरकारला अशा प्रकारचा एफआयआर दाखल करून घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
कोणाच्याही बापाला सोडणार नाही
तसेच, एफआयआर दाखल झालाच पाहिजे, असे तुम्हाला वाटत असेल तर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार तुम्हाला न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर न्यायालय एफआयआर दाखल करा असे निर्देश देते. राजकीय दृष्टीकोन ठेवून कर्नाटक राज्याने हे कृत्य केले आहे. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हे केले आहे, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आम्ही आकाश पातळ एक करू. अजितदादांचा घातपात असेल तर या प्रकरणात कोणाच्याही बापाला सोडणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta