Monday , May 25 2026
Breaking News

खाद्यतेल दराचा भडका!

Spread the love

 

युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत : प्रति किलो १० ते १५ रुपयांची दरवाढ

निपाणी (वार्ता) : इस्त्राईल -अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरावर होत आहे. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या असून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी आठवडाभरात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो १२ ते १५ रुपयांची वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात १५० दराने विकले जाणारे सोयाबीन तेल सध्या १६० ते १६५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचले आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले असून किराणा खर्चात वाढ झाली आहे. चूल पेटवायची की खर्चाचा हिशोब जुळवायचा? असा प्रश्न आता गृहिणीसमोर उभा आहे.
पामतेल, सूर्यफूल, शेंगदाणा तेलाच्या दरात वाढत होत आहे.
——————————————————————-
डाळी, भाजीपाला आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे आधीच घरगुती बजेट वाढले आहे. आता खाद्यतेल महागल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडते आहे. आता फोडणीसाठी लागणारे तेलही महागल्याने महिन्याचा खर्च कसा सांभाळायचा, हा प्रश्न निर्माण झाल्याचे प्रतिक्रिया जिजाबाई राऊत यांनी दिली.
——————————————————————–
खाद्यतेल दर
* तेल – जुने दर / नवीन दर
* सोयाबीन – १६० / १७०
* सूर्यफूल – १६५ / १८०
* पाम – १३५ / १४५
* मोहरी – १८५ /२००
* शेंगदाणा – १८० / १९५

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *