Sunday , April 5 2026
Breaking News

समरजीत घाटगेंची पुन्हा भाजप वापसी; मुंबईत 8 एप्रिल रोजी करणार पक्ष प्रवेश

Spread the love

 

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत भाजपातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या समरजीत घाटगे यांचा पुन्हा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. विधानसभा निवडणूकीत तिकिट न मिळू शकल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा समरजीत घाडगे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित भाजपात पक्षप्रवेश करत आहेत. येत्या 8 तारखेला मुंबईतील भाजप कार्यालयात त्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा पडणार आहे. यासंदर्भात स्वत: समरजितसिंह घाटगे यांनी माहिती दिली.

भाजपमध्ये बरेच दिवस माझा भाजपप्रवेश पेंडिंग होता, नगरपालिका आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशननंतर अधिकृत पक्षप्रवेश करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. आता, येत्या आठ तारखेला माझा भाजप प्रवेश होतोय. माझ्या मूळ पक्षात परत आलोय याचं मला समाधान आणि अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया समरजीत घाटगे यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत, त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केलं आहे. मी पक्षातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळते, याचही समाधान आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्यातच मी शरद पवार यांना भेटून माझी भूमिका सांगितली होती. शरद पवार यांना सांगूनच मी ही पुढची पावलं उचलली आहेत, असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीने बजावला समन्स

Spread the love  नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *