नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीत शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी शिंदे समर्थक खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांनंतर शिवसेना खासदारांनी वेगळी वाट धरल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपा सरकार केंद्रात २ मंत्रिपदे शिंदे गटाला देतील असं सांगितले जात आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. परंतु घराणेशाहीला विरोध करणारे पंतप्रधान मोदी शिवसेना खासदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरात केंद्रीय मंत्रिपदाचं गिफ्ट देणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
Belgaum Varta Belgaum Varta