Monday , September 21 2026
Breaking News

 निपाणी-नृसिंहवाडी पायी दिंडीत १०० जणांचा सहभाग 

Spread the love
भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : पदभ्रमंती ग्रुपतर्फे आयोजन
निपाणी (वार्ता) : अध्यात्म, आरोग्याच्या दृष्टीने युवा पिढी सक्षम व्हावी, या उद्देशाने यंदा अकराव्या वर्षी निपाणी नरसिंहवाडी पदभ्रमंती ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दिंडीमध्ये शंभर पेक्षा अधिक भाविकांनी सहभाग घेतल्याने या दिंडीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या दिंडीची सुरुवात पहाटे पाच वाजता दत्त मंदिर ढेरे गल्ली येथून करण्यात आली. त्यानंतर दलाल पेठ, साखरवाडी, निपाणी हालसिध्दनाथ मंदिर, न्यायालय, मंदिर, अकोळ, ममदापूर, गळतगा, बेडकिहाळ, शिरदवाड, बोरगाव, हेरवाड, कुरूंदवाडमार्गे दिंडी नृसिंहवाडीत पोहोचली. यावेळी विविध ठिकाणी रामदास गायकवाड, विनायक शिपुरे, संजय कोळकी, मनोज शिंदे, विजय कामते, अमोल देवडकर, शिवलिंग बिजले, मिलिंद पोवार, नंदकुमार कदम, हर्षल बाबर, सतीश फुटाणे प्रकाश कोपते यांनी चहा, नाश्ता व भोजनाची सोय केली होती.
दिंडीमध्ये रमेश देसाई, गंगाधर जाधव, अशोक लोहार, शिवाजी सुतार, मल्लाप्पा खोत, धीरज खोत, शंकर संकपाळ, चंद्रकांत किल्लेदार, राजेंद्र अलकनुरे, राहुल गुणके, रमेश माने, दिगंबर कुंभार, अशोक हजारे, शिवाजी पाटील, रमेश कदम, शैलेंद्र कांबळे, बाजीराव घाडगे, गीता हिरेमठ, ज्योती सदलगे, सुमित्रा हिरेमठ, अनुराधा फुटाणे, शोभा वडगावे, चंद्रकला संकपाळ, मीरा संकपाळ,वैशाली घाटगे, ललिता कोळकी, इंदुबाई रणविरे, सुवर्णा घाटगे, अश्विनी पोतदार यांच्यासह भाविकांनी सहभाग घेतला होता.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *