चेन्नई : मायावती यांच्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची ६ हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. आर्मस्ट्राँग हे त्यांच्या चेन्नईतील घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर अचानक ६ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे रक्तबंबाळ झाले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, आर्मस्ट्राँग यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, ही घटना घडली त्या परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta