Tuesday , March 3 2026
Breaking News

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एका अधिकाऱ्यासह ४ जवान शहीद

Spread the love

 

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न दहशतवादी सातत्याने करत आहेत. डोडा जिल्ह्यातील देसा जंगल परिसरात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या अधिकाऱ्यासह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडाच्या उत्तर भागात ही संयुक्त कारवाई करण्यात येत होती.

राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी संध्याकाळी सुमारे 7.45 वाजता देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी येथे संयुक्त शोध मोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांशी संपर्क झाला त्यानंतर जोरदार गोळीबार झाला. या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

जवळपास 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह चार लष्करी जवान आणि एक पोलिस जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि त्यापैकी चार जवानांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *