Sunday , December 7 2025
Breaking News

उत्तर प्रदेशात रेल्वे रुळावरून घसरली; चौघांचा मृत्यू

Spread the love

 

चंदीगड : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे चंदीगड-डिब्रूगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला आहे. या रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत चौघा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक प्रवाशी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ही घटना गोंडापासून ३० किलोमीटर दूर झिलाही रेल्वेस्टेशनच्या जवळ घडली आहे. प्रशासनाने बचाव पथकं गोंडाकडे रवाना केली आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

या अपघातामुळे गोरखपूर ते लखनौ डाऊन दिशेच्या रेल्वे गाड्या खोळंबल्या आहेत. सहा ते सात रेल्वेगाड्या रूळ रिकामा होण्याची वाट पाहत उभ्या आहेत. दुसऱ्या बाजूला या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने झिलाहीच्या दिशेने धाव घेतली आणि बचावकार्याला सुरुवात केली. दुर्घटनाग्रस्त डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. तसेच रेल्वेप्रशासनाने प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी केला आहे. ८९५७४०९२९२, ८९५७४००९६५ हे दोन हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहेत.

अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम हाती घेतली आहे
आरपीएफ व रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाचंही एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. यासह वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आलं असून डब्यांमध्ये डकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच प्राथमिक उपचारांसाठी एक वैद्यकीय पथकही काही वेळात घटनास्थळी पोहोचेल अशी माहिती रेल्वेने दिली आहे. दरम्यान, या अपघातानंतर गोंडा-झिलाही मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर रेल्वेगाड्या खोळंबल्या आहेत. सहा ते सात गाड्या उभ्या आहेत.

दुपारी २.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचं एका प्रवाशाने सांगितलं. ही एक्सप्रेस चंदीगडहून डिब्रुगडला जात होती. गोंडा स्थानकातून बाहेर पडून २० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर झिलाही स्थानकाच्या आधी एक्सप्रेस रुळावरून घसरून हा अपघात झाला. रेल्वेचे आठ ते दहा डबे रुळावरून घसरल्याचं प्रवाशाने सांगितलं. या अपघातामुळे रेल्वेचे रूळही उखडले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *