Tuesday , March 3 2026
Breaking News

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच उत्सुकता होती. आज (दि. २३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण लक्ष केंद्रीत करायला हवं. अंतरिम अर्थसंकल्पात आपण तेच केले असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात ९ घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश असून मोदी ३.० सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा
नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार
कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर
डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर
शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार
शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.
या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे
सोयाबीन आणि सुर्यफुल बियांची साठवण वाढवणार
३२ फळ आणि भाज्यांच्या १०९ जाती वितरीत करणार

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *