Tuesday , March 3 2026
Breaking News

मध्यप्रदेशमध्ये मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू

Spread the love

 

रिवा : श्रावणमासानिमित्त शाहपूरच्या हरदोलमध्ये शिवलिंग निर्माण आणि भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शिवलिंग बनविण्याचे काम सुरु होते. शिवलिंग बनविण्यासाठी १० ते १५ वर्षांची मुले या कार्यक्रमाला गेली होती. यावेळी शेजारील भिंत या मुलांवर कोसळून ९ मुलांचा मृत्यू, तर दोघेजण जखमी झाले आहेत. अनेकजण जखमी झाले आहेत.

माहितीनुसार मध्यप्रदेशमधील रिवा जिल्यातील सागर येथे मोठी दुर्घटना झाली. मुलांच्या अंगावर मंदिराची भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हरदौल बाबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान ही दुःखद घटना सकाळी ८. ३० च्या सुमारास घडली. ही मुले १० ते १५ वयोगटातील आहेत. घटनास्थळावरून सर्व मलबा हटवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी दिली.

मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेमुळे दुःख झाल्याचे म्हटले आहे. “मला आशा आहे की जखमी झालेले लोक लवकर बरे होतील. ज्यांनी आपली मुले गमावली त्यांच्या कुटुंबियांबद्दल माझ्या संवेदना. सरकार प्रत्येक कुटुंबाला ४ लाखांची मदत देईल.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *