Tuesday , March 3 2026
Breaking News

गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी यांना साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार

Spread the love

 

रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार
आरमोरी गडचिरोली : ‘अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा शिक्षक’ या विषयावर उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल तसेच
रचना प्रकाशन साहित्य समूह आम्ही शब्दांचे शिलेदार
आरमोरी गडचिरोली तर्फे वर्षभर घेण्यात येणार्‍या विविध उपक्रमात उत्कृष्ट काव्यलेखन केल्याबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेष भारतातीलही अनेक साहित्यिकांना मान देऊन साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले.त्यात फोंडा गोवा रहिवासी, एकमेव गोमंतकीय कवी नवनाथ रामकृष्ण मुळवी (एनटिसी एड्युकॅअर नवचैतन्य चे संस्थापक) यांनी पण साहित्यज्योती काव्यलेखन पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल गोव्यातील साहित्यप्रेमींकडुन आनंद व्यक्त करित अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. हा नामवंत पुरस्कार प्राप्त केलेल्यात गोव्यासहीत महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात राज्यातील साहित्यिकांचा समावेश आहे.
सौ. शोभा कोठावदे, मुंबई, नीरज आत्राम, चंद्रपूर, नम्रता खरे, मुंबई, शिवाजी सावंत, पुणे, कोठेकर योगिता संजय, पुणे, संगीता जामगे, डॉ. सौ. मीनाक्षी निळेकर,बीड, स्मिता भीमनवार, पुणे, लीलाधर दवंडे, कामठी, सौ. तृप्ती भंडारे, नालासोपारा, सौ. सारिका लाठकर, नांदेड, वैशाली बोरसे, धुळे, सरोजनी करजगीकर, परभणी, गणेश निकम, चाळीसगाव, सौ.वंदना चौधरी, गुजरात, सौ.नंदिनी शरद गलांडे, महेंद्र कोल्हटकर, डॉ आर. पी. गावडे, सौ.शोभा प्रकाश कोठावदे, ओंकार राठोड, संगिता घोडेस्वार, केशव डफरे, सुमनताई मुठे, पद्माकर वाघरूळकर, अशोक महादेव मोहिते, श्री वासुदेव सोनटक्के,संदीप भुक्कन पाटील, गवाजी बी बळीद,सौ.सुनिता अशोकराव आकनुरवार, प्रा.मन्नाडे रमा धनराज, रज्जाक शेख,अशोककुमार डी शिंदे सुजाता उके, नागपूर, संगीताताई भाऊसाहेब जामगे, गिरीश राधाकृष्ण भट, खेमदेव हस्ते, नवनाथ रामकृष्ण मुळवी (फोंडा-गोवा), उमेश बाऱ्हाटे, सौ. साधना सुरेश ब्राह्मणकार आणि सुनंदा अंभोरे, औरंगाबाद अशा तब्बल ४० साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *