नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची त्सुनामी पाहायला मिळाली. महायुतीच्या या विजयाचं दिल्लीतही सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खूश केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानले. हा निकाल हा महाराष्ट्रात घराणेशाहीचा पराभव असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. तसेच यावेळी ‘एक है तो सेफ है, असा पुन्हा एकदा नारा मोदींनी दिला.
महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीतील आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आज आपण आणखी एका ऐतिहासिक विजयाचा उत्सवासाठी आलो आहोत. आज महाराष्ट्रात विकासवादाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. तिथे सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात असत्य हरलं आहे. आज नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला आहे. आज घराणेशाहीचा पराभव झाला आहे’.
Belgaum Varta Belgaum Varta