नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली आहे. प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांची आज रविवारी संध्याकाळी अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते बरे व्हावे, यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी प्रार्थना सुरु केली होती. तब्येत बिघडल्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेतील फ्रान्सिसको रुग्णालयात उपचार सुरु होते. झाकीर हुसैन यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta