
विरुधुनगर : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील सत्तूर भागात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट झाला असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी आतापर्यंत 6 मृतदेह सापडले असून आणखी लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य हाती घेतले आहे. स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. परवानाधारक फटाक्यांच्या कारखान्यात ही दुर्घटना घडली.

Belgaum Varta Belgaum Varta