
तिबेट : नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटच्या डोंगराळ प्रदेशात मंगळवारी सकाळी एका तासाच्या आत सलग सहा भूकंप झाले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.1 मोजली गेली. या भूकंपाचे धक्के भारत आणि बांगलादेशच्या अनेक भागात जाणवले. परंतु भूंकपाचा केंद्रबिंदू तिबेट होता. या भूकंपात किमान 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. 38 लोक जखमी झाले आहेत.
भारतापर्यंत भूकंपाचे धक्के
मंगळवारी सकाळी 6.52 च्या सुमारास भूकंप झाला. नेपाळमधील काठमांडू, धाडिंग, सिंधुपालचौक, कावरे, मकवानपूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, मात्र भारतातून अद्याप कोणतीही जीवितहानीचे वृत्त नाही. रॉयटर्सच्या बातमीनुसार, तिब्बेटमध्ये या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिब्बेटच्या शिगात्से शहरात अनेक इमारती उद्धवस्थ झाल्या आहेत. मागील पाच वर्षांत शिगात्से शहराच्या 200 किलोमीटर परिसरात 3 किंवा त्यापेक्षा जास्त रिश्टर स्केलचे 29 भूंकप आले आहेत. परंतु मंगळवारी आलेला भूकंप 7.1 रेश्टर स्केलचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
भारत, नेपाळ, बांगलादेश आणि भूतानच्या अनेक भागांत भूकंपाचे झटके जाणवले. सिक्कमसह पूर्वत्तर राज्यांमध्ये भूकंपचे धक्के बसले. बिहार, पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर लोक घरातून बाहेर आले.
नागरिकांना असा आला अनुभव
काठमांडू येथील रहिवासी असलेल्या मीरा अधिकारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘मी झोपले होते. अचानक पलंग हादरायला लागला. मला वाटले माझे मूल अंथरुण हलवत आहे. मी फारसे लक्ष दिले नाही, पण खिडकीच्या थरथरत्या आवाजाने मला जाणवले की एक जोरदार भूकंप झाला आहे. मी पटकन माझ्या मुलाला घेऊन घराबाहेर पडलो आणि मोकळ्या मैदानात आले.

Belgaum Varta Belgaum Varta