तिरुपती : प्रसिद्ध तिरुपती मंदिराच्या विष्णू निवासाजवळ चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. या चेंगराचंगरीच्या घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिरुपती मंदिराच्या रामानायुडू शाळेजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत मल्लिगा (५०) यांच्यासहित एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ६ जणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुमला स्थित भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरात बुधवारी रात्री चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तिरुमला तिरपती देवस्थानमच्या प्रमुखांनी ही माहिती दिली आहे. वैकुंठ द्वार येथे दर्शनासाठी शेकडो लोकांनी तिकीट मिळवण्यासाठी गर्दी केली, त्यावेळीच ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या मंदिरात देशभरातून शेकडो भाविक हजेरी लावतात. यासाठीच शेकडो भाविक १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या १० दिवसांच्या वैकुंठ द्वार दर्शनासाठी आले होते.
आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी घटनास्थळावरील परिस्थिती हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन करून विचारपूस केली. तसेच यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू यांनी उच्च अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य करण्याचा आदेश दिला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू यांनी दु:ख व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta