नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भाजपाचे कमळ फुलले आहे. 27 वर्षानंतर भाजपा दिल्लीत सत्तेवर येताना दिसत आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपाने 41 जागांवर मुसंडी मारली. तर आम आदमी पक्ष हा 29 ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला सून पक्षाला एकही जागा मिळालेली नाहीये. आपवर झालेले आरोप, मुख्यमंत्र्यांची तुरूंगवारी यामुळे दिल्लीकरांनी आपला नाकारल्याचं चित्र दिसत आहे.
विधानसभेतील भाजपचा परफॉर्मन्स पाहता भाजपने 33 अधिकच्या जागा या निवडणुकीत मिळवल्या आहेत. 2020 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 33 जागांचा फायदा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्लीत जल्लोषाला देखील सुरूवात झाली आहे. भाजप कार्यालयात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमताना दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta