
सीधी : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाताना भाविकांनी भरलेली बोलेरो गाडी ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. बोलेरोमधून सर्व भाविक महकुंभात पवित्र स्नान करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी काळाने घाला घातला.
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरो बस ३० फूट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की बोलेरे बसच्या चेंदामेंदा झाला. अपघातामधील जखमींवर रीवा येथील संजय गांधी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ जखमींना रूग्णालयात दाखल केले. मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून त्यांच्या अंदाजानुसार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोलेरो दरीत कोसळली. सुजीत यादव, प्रमोद यादव, संदीप साहू आणि रमाकांत साहू यांचा अपघात मृत्यू झाला. सर्वजण मित्र होते, अचानक त्यांनी महाकुंभला जाण्याची योजना आखली, पण तिथे जाण्याआधीच काळाने घाला घातला. चार मित्रांचा अपघाती मृत्यू झाला, तर चार जण जखमी आहेत. कृष्णा साहू, प्रदीप साहू यांच्यासह चार जण या अपघातात जखमी झाले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta