नवी दिल्ली : ‘असनी’ चक्रीवादळाची तीव्रता आज गुरुवारी कमी झाली. सध्या हे वादळ आंध्र प्रदेशमधील मच्छीलीपट्टणमच्या पश्चिमेस घोंघावत आहे. पुढील 12 तासांत ते कमी दाबाच्या क्षेत्रात आणखी कमकुवत होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावर नैऋत्य मोसमी वार्यांचा जोर वाढला आहे. यामुळे दक्षिण अंदमान समुद्रात मान्सून वेळेआधीच दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 4 आठवड्यात देशातील अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मान्सूनची वाट ‘असनी’ने ‘आसान’
पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाची शक्यता आहे. तर दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात अरबी समुद्रावर पाऊस पडणार असल्याचे संकेत आहे. दुसर्या आणि त्यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतचा आग्नेय अरबी समुद्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …