Tuesday , March 3 2026
Breaking News

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची अखेर ‘ग्रह’वापसी

Spread the love

 

नवी दिल्ली : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची आज पहाटे ग्रहवापसी झाली आहे. अवघ्या आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या होत्या मात्र तब्बल नऊ महिने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अंतराळात अडकून पडल्या होत्या. आज पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी प्लोरिडाच्या किनारपट्टीवर अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचं यशस्वी लँडिंग झाले आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे दोघेही ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना घेऊन नासा आणि स्पेस एक्सचं कॅप्सुल भारतीय वेळेनुसार आज बुधवारी पहाटे तीन वाजून २७ मिनिटांनी पृथ्वीवर दाखल झाले आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर 5 जून 2024 रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते. तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले होते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आज पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *