मानवतावादी कार्य आणि जगाला शांततेचा संदेश देणारे ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. व्हॅटिकन यांनी व्हिडिओ पोस्ट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोप फ्रान्सिस यांनी सोमवारी सकाळी ७:३५ वाजता अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते.
पोप यांच्या निधनाच्या या बातमीने जागतिक ख्रिश्चन समुदायावर शोककळा पसरली आहे. पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कारकिर्दीत चर्चमध्ये सुधारणा, मानवतावादी कार्य आणि शांततेचा संदेश दिला. त्यांच्या निधनानं जगभरातील ख्रिश्चन भाविक शोकसागरात बुडाले आहेत. व्हॅटिकनने पुढील प्रक्रियेसाठी कॉन्क्लेव्ह बोलावण्याची तयारी सुरू केली आहे.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर व्हॅटिकन यांनी पुढील प्रक्रियेबाबत माहिती दिली. कार्डिनल फेरेल यांनी सांगितले की, लवकरच नवीन पोप निवडीसाठी कॉन्क्लेव्ह बोलावले जाईल. पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने जागतिक ख्रिस्ती समुदायावर शोककळा पसरली आहे. जगभरातील नेते आणि भाविकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पोप फ्रान्सिस हे गेल्या काही महिन्यांपासून आजारांशी लढत होते. फेब्रुवारीमध्ये ब्रॉन्कायटिसमुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ब्रॉन्कायटिसचे डबल न्यूमोनियामध्ये रूपांतर झाले. पोप यांच्यावर पाच आठवडे रुग्णालयात उपचार सुरू होते. न्यूमोनिया आणि श्वसनाचा त्रास त्यांना होता. रोममधील जेमेली रुग्णालयात ३८ दिवसांच्या उपचारांनंतर २३ मार्च २०२५ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना दोन महिन्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.
Belgaum Varta Belgaum Varta