Friday , June 5 2026
Breaking News

निवृत्त डीजी-आयजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पत्नी, मुलीविरुद्ध एफआयआर दाखल

Spread the love

 

बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे निवृत्त डीजी-आयजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि मुलीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त डीजी-आयजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या मुलाने आपली आई पल्लवी आणि धाकटी बहीण क्रिती यांनी ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करून ओम प्रकाश यांचा मुलगा कारतिकेश याने बेंगळुरू येथील एचएसआर लेआउट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

माझ्या आई आणि वडिलांना आठवडाभरापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. तसेच काल संध्याकाळी घरी आलो तेव्हा माझे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याच्या शेजारी एक बाटली आणि चाकू त्याच्या अंगावर खुपसलेला होता. त्यामुळे ही हत्या आई आणि बहिणीने केल्याचा संशय असल्याने त्याने तक्रार केली. या संदर्भात ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी क्रिती यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

डी. के. शिवकुमार यांच्यासोबत बेळगावातून सतीश जारकीहोळी घेणार मंत्री पदाची शपथ

Spread the love  बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झालेल्या नव्या सरकारच्या स्थापनेला बुधवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *