रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलट ए.पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा होते. प्रॅक्टिस दरम्यान हेलिकॉप्टर पुन्हा लँड केले जात होते, तेव्हा त्यामध्ये आग लागली आणि हेलिकॉप्टर कोसळले. यात दोन पायलटांचा मृत्यू झाला.
रायपूरचे जिल्ह्याचे एसपी प्रशांत अग्रवाल म्हणाले की, शहरातील माना क्षेत्रात स्वामी विवेकानंद विमानतळावर राज्य शासनाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते. ते विमानतळावर 9.10 वाजता फ्लाईंग प्रॅक्टिस करत होते. तेव्हा हा अपघात झाला. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टरांना त्यांनी मृत घोषीत केले.
राज्य सरकारचे हे हेलिकॉप्टर होते. समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारचे हेलिकॉप्टर रात्री 9.10 वाजता रायपूर विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये कॅप्टन ए. पी. श्रीवास्तव आणि कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनानेदेखील त्यांच्या मृत्यूची माहिती दिलेली आहे.
या अपघातात हेलिकॉप्टर चक्काचूर झाले आहे. त्याचे एक पंख दूरवर जाऊन पडले आहे. परंतु, हा अपघात कसा झाला, त्याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघाताची माहिती ट्विटरवर देऊन मृत पायलटांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. अपघातामध्ये हेलिकॉप्टर चक्काचूर झाल्यामुळे जखमी पायलटांना बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.
Check Also
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन काळाच्या पडद्याआड
Spread the love नवी दिल्ली : २०२४ वर्ष संपता संपता एक दु:खद बातमी हाती आली …