
नवी दिल्ली : 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्याने अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद समोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती मिळाली आली आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरचे आख्खे कुटुंब संपले असल्याची माहिती समोर आली आहे.
मसूद अझहरच्या भाऊ, बहिणीसह 14 जणांना मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील पीओके दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केले आहे. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यांनी भूमिका बजावली होती.
Belgaum Varta Belgaum Varta