Tuesday , March 3 2026
Breaking News

पाकिस्तानच्या तोफगोळ्याच्या माऱ्यात आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू

Spread the love

 

जम्मू काश्मीर : सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिले जात असताना भारतातील अनेक नागरिकांना यामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी येथे पाकिस्तानने डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोट झाला. त्यामध्ये राजौरीचे अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा शहीद झाले आहेत. यासह आणखी दोन नागरिकांचाही मृत्यू झाला.
पाकिस्तानने शनिवारी पहाटेच जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा आयुक्त राजकुमार थापा यांच्या घरावर पाकिस्तानने तोफगोळा डागला. या तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने राजकुमार थापा गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह दोन नागरिकही जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु राजकुमार थापा आणि दोन नागरिकांना यांना मृत घोषित करण्यात आले.
राजकुमार थापा यांच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजौरीमधून अत्यंत वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवेतील एक चांगला अधिकारी आपण गमावला. माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांबरोबर काल दिवसभर होते. पण आज त्यांच्या निवासस्थानावर पाकिस्तानने लक्ष्य केले. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला. यावेळी दुःख व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत”, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *