
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये दहशतवादी सैफुल्लाह खालीदची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉपचा कमांडर होता.
नेपाळमध्ये हाता सक्रीय
सैफुल्लाह याच्यावर पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा लष्कर ए तैयबा या संघटनेचे नेपाळमधील युनिट सांभाळायचा. लष्कर ए तैयबा या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी केडर उभे करणे तसेच आर्थिक मदत पुरवणे हे त्याचे प्रमुख काम होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तो नेपाळमध्ये सक्रिय होता.
भारतावरच्या तीन हल्ल्यांत होता समावेश
सैफुल्लाह या दहशतवाद्याचा भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमध्ये मोठा सहभाग होता. रामपूर येथे सीआरपीएफ कँपवरील हल्ला, नागपुरातील संघाच्या मुख्यालयावरील हल्ला, तसेच आयआयएससी बंगळुरू येथील बॉम्बस्फोटात याचा सहभाग होता. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील बदीन जिल्ह्याच्या माटली तालुक्यात याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. सैफुल्लाह हा दहशतवाद्यांना नेपाळच्या मार्गे भारतात पाठवण्याचेही काम करायचा.
Belgaum Varta Belgaum Varta