Monday , December 8 2025
Breaking News

राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून हकालपट्टी

Spread the love

लखनौ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात केलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले राकेश टिकैत यांची भारतीय किसान युनियनमधून (बीकेयू) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांचे बंधू नरेश टिकैत यांचीही अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश चौहान यांना अध्यक्ष करण्यात आले आहे.
बीकेयूचे संस्थापक दिवंगत चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांच्या पुण्यतिथीनिमित्त बीकेयूच्या नेत्यांची बैठक आज (रविवार) लखनौ येथील ऊस शेतकरी संस्थेत पार पडली. त्यात टिकैत बंधूंविरोधात हा निर्णय घेण्यात आला. टिकैत कुटुंबाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असलेल्या या नाराजीनंतर भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या कार्यशैलीवर बीकेयूचे अनेक सदस्य नाराज होते. टिकैत यांनी आपल्या राजकीय वक्तव्यांनी आणि कार्यपद्धतीमुळे अराजकीय संघटनेला राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. बीकेयू नेत्यांच्या या नाराजीनंतर टिकैत शुक्रवारी रात्री लखनौमध्ये दाखल झाले होते.
संतप्त शेतकरी नेत्यांचे नेतृत्व करणारे बीकेयूचे उपाध्यक्ष हरिनाम सिंग वर्मा यांच्या निवासस्थानी टिकैत यांनी संघटनेच्या नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही, त्यामुळे ते मुझफ्फरनगरला माघारी परतले. त्यानंतर फतेहपूरचे रहिवासी बीकेयूचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेश चौहान यांच्या नेतृत्वाखाली नवीन संघटना स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या. आणि लखनऊमध्ये आज त्यांच्या नावाची घोषणा कऱण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

रूग्णवाहिकेने घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू

Spread the love  अहमदाबाद : रूग्णवाहिकेने पेट घेतल्याने नवजात बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *