
सिक्कीमच्या लाचेन येथे एका लष्करी छावणीत भूस्खलन झाले आहे. या दुर्घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. तर सहा सैनिक बेपत्ता आहेत. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, लाचेन येथे भूस्खलन झाले आहे. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जवान बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून बेपत्ता असलेल्या जवानांचा शोध सुरू आहे. अत्यंत आव्हानात्मक भूभाग आणि प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये बचाव पथकांचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून चार जवानांना वाचवण्यात यश आले आहे, ते या घटनेत जखमी झाले आहेत. तर हवालदार लखविंदर सिंग, लान्स नाईक मनीष ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लखारा या जवानांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
भारतीय सैन्य दलाकडून या घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे, या घटनेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाचेन येथे भूस्खलन घडून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे, अशा दु:खद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत, या जवानांच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान या घटनेत अद्यापही सहा जवान बेपत्ता असून, घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta