
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. थायलंडमधील फुकेट येथून नवी दिल्लीकडे येणाऱ्या AI-379 या विमानाला शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या तात्काळ निर्णयामुळे विमान सुरक्षितपणे फुकेट विमानतळावर उतरवण्यात आले असून, विमानातील 156 प्रवासी आणि सर्व क्रू सदस्य सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, थायलंडमधील फुकेट येथे एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालिन लँडिंग करण्यात आलं आहे. हे विमान फुकेटहून नवी दिल्लीला येत होते. परंतु, बॉम्बच्या धमकीनंतर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे विमान एआय 379 हे फुकेटहून नवी दिल्लीला निघाले होते. त्यात 156 प्रवासी होते. परंतु, उड्डाणानंतर बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यानंतर, विमान अंदमान समुद्राभोवती प्रदक्षिणा घालून परत आले. तसेच आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एओटीने अद्याप बॉम्बच्या धमकीची पुष्टी केलेली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta