बेळगाव : समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेने त्यांच्यासाठी काही तरी करू शकतो. या विचाराने ‘रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण’च्या सदस्यांनी येथील ‘किआन-अ चिल्ड्रन्स होम’ला जीवनावश्यक साहित्य आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
‘रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण’च्या सदस्यांनी तेथील मुलांच्या चेहऱ्यावर हास्य खुलविण्यासाठी, त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक किराणा सामान आणि स्कूल बॅग दिल्या. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण’च्या अध्यक्षा रुपाली जनाज, कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा पाटील, आशा पोतदार, लक्ष्मी चवळी, सविता वेसणे उपस्थित होत्या.