इस्रायल आणि इराणमधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानवर या केंद्रांवर यशस्वी हवाई हल्ला केला आहे. अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या ठिकाणांवर बॉम्ब टाकले. ज्यामध्ये फोर्डो हे मुख्य लक्ष्य होते.
बी-२ बॉम्बर्सचा वापर
अमेरिकन हल्ल्याच्या काही तास आधी अमेरिकेने त्यांचे स्टिल्थ बी-२ बॉम्बर्स इराणकडे पाठवले होते. या निर्णयानंतर अमेरिका या युद्धात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणचे ३ अणू प्रकल्प उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. बी-२ बॉम्बर्स हे एकमेव विमान आहे जे बंकर बस्टर बॉम्ब टाकण्यास सक्षम आहे. अमेरिकेने या बी-२ बॉम्बर्सने फोर्डो नष्ट केले आहे.
इराणविरुद्ध इस्रायलच्या लष्करी मोहिमेचा निर्णय घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे घेतले होते. दोन आठवड्यात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. ट्रम्प यांच्या या विधानाच्या आदल्या दिवशी अमेरिकेने त्यांचे अत्याधुनिक लढाऊ विमान बी२ बॉम्बर्स प्रशांत महासागरात असलेल्या त्यांच्या ग्वाम हवाई तळाकडे पाठवले होते.
Belgaum Varta Belgaum Varta