
नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला अंतराळ स्थानकात एन्ट्री केल्यामुळे भारताचे स्वप्न पूर्ण झाले. शुभांशू शुक्लामुळे पहिला भारतीय अंतराळ स्थानकात पोहोचला आहे. आता शुभांशूसह तीन अंतरावीर पुढील 14 दिवस तिथे राहणार आहेत. शुभांशू शुक्ला अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत, स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटं आधी दाखल झाला आहे. त्यानंतर 1-2 तासांची तपासणी करण्यात आली, ज्यामुळे हवेची गळती आणि दाब स्थिरतेची पुष्टी करण्यात आली. त्यानंतर, क्रू ISS मध्ये प्रवेश केला आहे. हे अंतराळयान 28,000 किमी/तास वेगाने 418 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 26 तासांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आता ते अंतिम टप्प्यात आहे. यासाठी, अंतराळयानाने आयएसएसच्या कक्षेशी स्वतःला जुळवून घेण्यासाठी अनेक कक्षीय युक्त्या केल्याच पाहिला मिळत आहेत.
ड्रॅगन कॅप्सूलची डॉकिंग प्रक्रिया
ड्रॅगन कॅप्सूलचे आयएसएसशी डॉकिंग ही एक स्वयंचलित प्रक्रिया असून शुभांशू आणि कमांडर पेगी व्हिटसन त्याचे निरीक्षण . ही प्रक्रिया अचूकता आणि सुरक्षिततेसाठी डिझाइन केलेली आहे. ती चार मुख्य चरणांमध्ये समजेल. ड्रॅगन कॅप्सूल प्रक्षेपणानंतर 90 सेकंदात इंजिन सुरू होऊन त्याचा वेग आणि दिशा समायोजित करतो. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:33 वाजता, अंतराळयान 400 मीटर खाली आणि 7 किमी मागे सुरू झाले आणि आता 200 मीटर अंतरावर आहे. स्पेसएक्स आणि नासा ग्राउंड कंट्रोलर्स अंतराळयानाच्या प्रणाली तपासतात.
200 मीटर अंतरावर, ड्रॅगन आयएसएसशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात करतो. हा टप्पा 6 तासांपर्यंत सुरक्षित मार्गावर राहू शकतो जेणेकरून कोणताही धोका राहणार नाही.
20 मीटर अंतरावर, ड्रॅगन आयएसएसच्या हार्मनी मॉड्यूलच्या डॉकिंग पोर्टशी अचूकपणे जुळण्यासाठी लेसर सेन्सर, कॅमेरे आणि जीपीएस वापरतो. ते प्रति सेकंद काही सेंटीमीटर वेगाने फिरते, जे अत्यंत मंद आणि नियंत्रित वेग आहे. शुभांशू या काळात अंतराळयानाचा वेग, कक्षा आणि प्रणाली यांचं निरीक्षण करेल.

Belgaum Varta Belgaum Varta